सरकारवाले (sarkarwale.in) – नियम आणि अटी (Terms and Conditions)
नमस्कार सरकारवाले sarkarwale.in संकेतस्थळावर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही आमच्या वेबसाईट आणि सेवा वापरत आहे तर कृपया खाली दिलेले नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. कारण आमच्या वेबसाईट आणि सेवांचा वापर तुमच्या या अटींच्या अवलंबून आहे.
वेबसाईट आणि सेवा वापरण्यासाठी पात्रता :
आमच्या संकेतस्थळ वापरण्यासाठी तुमचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. आणि जर तुमचे वय कमी असेल तर तुम्ही तुमच्या पालकांच्या तसेच संरक्षण कर्त्यांच्या परवानगीने आमची वेबसाईट आणि सेवा वापरू शकता.
आम्ही प्रदान करणाऱ्या सेवांचे वर्णन:
सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या संधींची माहिती. तुमच्या करिअरसाठी मार्गदर्शन आणि टिप्स. मुलाखतीच्या तयारीसाठी सल्ले.
तुमच्या जबाबदाऱ्या :
स्वतःचे कर्तव्य :
तुम्ही तुमच्या करिअरच्या यशासाठी स्वतः जबाबदार आहात. आम्ही केवळ तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुमची खाते सुरक्षा :
तुम्ही तुमच्या सर्व खात्याची माहिती तसेच पासवर्ड गुप्त ठेवा. आणि अनधिकृत वापराची माहिती आम्हाला तात्काळ कळवा.
आमचे बौद्धिक हक्क :
आमच्या वेबसाईटवरील सर्व कॉपीराईट आणि इतर बौद्धिक हक्क आमच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे आमच्या परवानगीशिवाय याचा कोणताही कॉपी, बदल किंवा त्याचा वापर करू नका.
सरकरवाले संकेतस्थळावरची सर्व माहिती संकलित केली गेलेली आहे. त्यामुळे ती कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमातून, पुन्हा मुद्रित करता येईल. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने किंवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. ज्यावेळेस अशा माहितीचे किंवा सामग्रीचा वापर कराल त्यावेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे.
आमच्या वेबसाईट आणि सेवांचे अस्विकरण :
आमच्या वेबसाईट आणि सेवा जशा आहेत आणि जशा उपलब्ध आहेत या आधारावर प्रदान केल्या जातात. त्यामुळे अचूकता आणि पूर्णतेची आम्ही कोणतीही हमी देत नाही. आणि त्यामुळेच आम्ही कोणत्याही हानी साठी जबाबदार नाही.
नियम आणि शर्त बदल :
आम्ही आमच्या वेबसाईट आणि सेवांच्या नियम आणि अटी धोरणांमध्ये बदल करू शकतो. या बदलांची सूचना देण्याकरिता आम्ही आमच्या वेबसाईट वर नोटीस सादर करू.
तुम्ही आम्हालाच का निवडावं? (सरकारवाले)
विश्वास : आम्ही तुम्हाला अचूक माहिती प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. कारण जर तुमच्याकडे योग्य ती माहिती असेल तरच तुम्ही सर्वोत्तम निर्णय घेऊ शकतात.
सुलभता : आम्ही सर्वांकरिता सुलभ आहोत. कारण आमची सर्वसामग्री ही मातृभाषा मराठी मध्ये आहे. जेणेकरून केवळ भाषेमुळे तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही
समुदायिक भावना : आम्ही एक सहाय्य करणारा परिवार तयार करण्यावर विश्वास ठेवतो. जेथे तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न विचारू शकता, तुमचा अनुभव शेअर करू शकता, दुसऱ्यांच्या अनुभवांमधून काहीतरी शिकू शकता आणि इतरांशी देखील कनेक्ट होऊ शकता.