नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MIDC Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील त्यांच्या प्रादेशिक कार्यालयाची संख्या वाढत्या औद्योगिकरणाच्या तुलनेत खूप कमी आहे. सद्य: स्थिथी मधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात त्यामानाने कामकाजात वाढत्या औद्योगिकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी दोन तीन जिल्ह्या साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एक एकच प्रादेशिक कार्यालय आहे. त्यामुळे त्या भागातील उद्योजकांना कार्यालयातील कामकाजासाठी दूर अंतरापर्यंतचा प्रवास करावा लागतो. तसेच प्रस्तावित नविन प्रादेशिक कार्यालयाच्या क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रासाठी मनुष्यबळाची गरज लागणार आहे.
MIDC Recruitment 2024
पदांची नावे –
1.प्रादेशिक अधिकारी – 07 पदे, वेतन – 56,100-1,77,500 रूपये
2.व्यवस्थापक (प्रादेशिक अधिकारी समकक्ष पदे) – 05 पदे, वेतन – 56,100-1,77,500 रूपये
3.क्षेत्र व्यवस्थापक – 01 पदे, वेतन – 41,800-1,32,300 रूपये
4.उप रचनाकार – 07 पदे, वेतन – 56,100-1,77,500 रूपये
5.प्रमुख भूमापक – 07 पदे, वेतन 29,200-92,300 रूपये
6.सहायक क्षेत्र व्यवस्थापक – 14 पदे, वेतन 38,600-1,22,800 रूपये
7.सहायक – 17 पदे, वेतन 35,400-1,12,400 रूपये
8.लिपीक टंकलेखक – 17 पदे, वेतन 19,900-63,200 रूपये
9.वाहन चालक – 07 पदे, वेतन 19,900-63,200 रूपये
10.शिपाई – 10 पदे, वेतन 15,000-47,600 रूपये
एकूण 92 पदे भरण्यात येणार आहेत.
सातारा, सोलापूर, बारामती, अहमदनगर, जळगांव, अकोला व चंद्रपूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे 07 प्रादेशिक कार्यालय स्थापन करणे व सदर कार्यालयासाठी 92 नविन पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारात होती. त्यामुळे शासनाने हा नविन जी आर काढलेला आहे.
MIDC Bharti 2024
शासन निर्णय – उद्योग विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सोलापूर, सातारा, बारामती, अहमदनगर, जळगांव, अकोला तसेच चंद्रपूर येथे प्रस्तावित 07 प्रादेशिक कार्यालयांकरीतासाठी निर्मितीस खालील अटींच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.
- वित्त विभागाच्या मान्यतेस अनुसरून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा एकत्रित आकृतीबंध शासन निर्णय निर्गमित केल्यापासून 10 महिन्याच्या कालावधीत दि. 02/05/2025 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाच्या वित्त विभागाकडून मंजूर करून घेण्यात यावा.
- सदर पदांचा एकत्रित आकृतीबंध 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मंजूर न झाल्याने सदर 92 पदे व्यपगत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची राहील.
- या पदांचे वेतन व इतर अनुषंगिक खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून भागविण्यात यावा.
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MIDC Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या MIDC Bharti 2024 साठी पात्र असाल आणि एमआयडीसी मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
जाहिरात (GR): येथे क्लिक करा
हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 पदांची भरती सुरू असा करा अर्ज
अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा