नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे महाराष्ट्र शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 60,000 रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच त्याचा जीआर शासनाकडून मंजूरही करण्यात आला आहे. तसेच ही शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत मिळणार आहे. तुम्हाला माहिती असेलच की शासन सतत जनतेच्या हितासाठी खूप साऱ्या योजना राबवत असते, त्यापैकीच ही एक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे, त्याचीच माहिती आम्ही आज आपल्याला या लेखामधून देणार आहोत.
मित्रांनो खूप विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिति खराब असते आणि त्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन माननीय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने इतर मागासवर्गीय, वगळलेल्या जाती तसेच भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून ही Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana सुरू करण्यासाठी मंजूरी दिली आहे 19 ऑक्टोंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
Dnyanjyoti Savitribai Phule Scholarship Yojana ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने सूरु केली आली आहे.
या योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे ठेवण्यात आले आहे. तर ही योजना महाराष्ट्र शासन द्वारे राबवण्यात येत आहे. या योजनेचा विभाग इतर मागास बहुजन विकास महामंडळ असून ओबीसी विद्यार्थी या योजनेचे पात्र लाभार्थी असतील.
या योजनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी एकूण 60,000 रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेसाठी विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने अर्ज करू शकतात.
Gyan Jyoti Savitribai Phule Aadhar Yojana
मित्रांनो महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली ही योजना भटक्या जमाती – क वर्गात मोडणाऱ्या (धनगर) समाजाच्या विद्यार्थ्यांचा वगळता विशेष मागासवर्गातील उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे एकूण 21,600 विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ च्या अंमलबजावणीला मंजूरी देण्यात आली आहे, मुख्यतः उच्च शिक्षणातील विशेष मागास प्रवर्गातील प्रति जिल्हा 600 विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
Savitribai Phule Aadhar Yojana Eligibility
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता: या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा OBC, SC किंवा ST प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
- तसेच त्या विद्यार्थ्याकडे ओबीसी (ओबीसी) मागासवर्गीय जातीचे जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- तसेच अर्जदार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलमध्ये किंवा वसतिगृहात राहणारा असावा.
- या योजनेसाठी विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टद्वारे निवडले जाणार आहे.
- तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे आणि या योजनेची उत्पन्न मर्यादा केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढीनुसार असणार आहे.
- अर्जदारांना त्यांचा आधार नंबर त्यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. तसेच महत्वाचे म्हणजे विद्यार्थी त्या शहरात किंवा तालुक्यात रहिवासी नसावा जेथे त्याने नोंदणी केलेली शैक्षणिक संस्था आहे.
शैक्षणिक पात्रता (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Educational Qualification)
- अर्जदार विद्यार्थी हा चालू वर्षामध्ये शाळेत शिकत असणे महत्वाचे आहे.
- अर्जदार विद्यार्थ्याने 12वी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेतले पाहिजे.
- या योजनेचा लाभ त्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहे ज्यांनी मागील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 600 विद्यार्थी निवडले जाणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांने मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेत आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, ऑल इंडिया मेडिकल काऊन्सिल, इंडियन फार्मसी काऊन्सिल, आर्किटेक्चरल काऊन्सिल, राज्य सरकार किंवा तत्सम प्रशासकीय मंडळाने मंजूर केलेल्या अभ्यासक्रमात नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या 12वी मधील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन निश्चित केले जाईल. या योजनेअंतर्गत, 70% प्रवेश व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत, तर बाकी 30% गैर-व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील.
- ज्या वेळेस विद्यार्थी अर्ज करेल तेव्हा व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कमीतकमी 60% किंवा समतुल्य ग्रेड/ CGPA असणे गरजेचे आहे.
Scholarships for Higher Education in Maharashtra
Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे विद्यार्थ्यांना मिळणारी एकूण रक्कम: मित्रांनो विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम वेगवेगळ्या ठिकानानुसार वेगवेगळी मिळणार आहे, त्याची पूर्ण माहिती खाली दिली आहे.
जाणार खर्च | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एवढी रक्कम मिळेल. | इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळणारी अनुदेय रक्कम. | इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम. | इतर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळणारी अनुदेय रक्कम. |
भोजन भत्ता | 32000/- रुपये. | 28000/- रुपये. | 25000/- रुपये. | 23000/- रुपये. |
निवास भत्ता | 20000/- रुपये. | 15000/- रुपये | 12000/- रुपये. | 10000/- रुपये. |
निर्वाह भत्ता | 8000/- रुपये. | 8000/- रुपये. | 6000/- रुपये. | 5000/- रुपये. |
एकूण खर्च 60000/- रुपये. | 51000/- रुपये. | 51000 | 43000/- रुपये. | 38000/- रुपये. |
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Documents
- सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे
- अर्जदार विद्यार्थ्याचे आधार कार्ड.
- SC, ST किंवा OBC मागासवगीर्य जातीचे जात प्रमापत्र.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- अर्जदार विद्यार्थी किंवा त्याच्या पालकाचे बँक खाते पासबुक.
- अर्जदार विद्यार्थ्याची इयत्ता 10 वी आणि 12 वी चे गुणपत्रक.
- अर्जदार विद्यार्थ्यांने महाविद्यालय, विद्यापीठ किंवा कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा (उदा. प्रवेश प्रमाणपत्र किंवा पावती).
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Online Apply
मित्रांनो, अद्याप ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. जर अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असेल तर, तुम्ही इतर मागासवर्गीय बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयातून (ऑफिसमधून) फॉर्म मिळवू शकता आणि अर्ज भरू शकता.
परंतू, सध्या यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. जेव्हा अर्ज करण्याबाबतची नवीन माहिती येईल तेव्हा आम्ही देखील तत्काळ अपडेट करू. जर तुम्हालाही नवीन माहिती वेळेवर हवी असेल तर WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला ग्रुपमधून नवीन माहिती मिळेल.
अधिकृत जाहिरात: येथे क्लिक करा
हेही वाचा: आण्णासाहेब पाटील कर्ज योजना 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पहा सविस्तर माहिती
अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा
सावित्रीबाई फुले योजनेसंबधी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न:
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana साठी अर्ज करण्याची तारीख काय आहे?
मित्रांनो, अद्याप ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. जर अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असेल तर, तुम्ही इतर मागासवर्गीय बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयातून (ऑफिसमधून) फॉर्म मिळवू शकता आणि अर्ज भरू शकता.
Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे विद्यार्थ्यांना एकूण किती आर्थिक मदत मिळणार आहे?
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे शासनाव्दारे OBC विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी 60,000 रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Savitribai Phule Aadhaar Yojana काय आहे?
महाराष्ट्र शासनाद्वारे मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी 60,000 रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत मिळणार आहे.