Annasaheb Patil Loan Scheme Information In Marathi – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 संपुर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पण नवीन काही व्यवसाय सुरू करायचा आहे तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाद्वारे तब्बल 50 लाखापर्यंत कर्ज तेही बिनव्याजी दिले जात आहे. तुम्ही जर बेरोजगार असाल आणि तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचे नाव Annasaheb Patil Loan Scheme Information In Marathiअण्णासाहेब पाटील कर्ज योजना असे आहे.

Annasaheb Patil Loan Scheme Information
Annasaheb Patil Loan Scheme Information

या लेखातून या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. मित्रांनो जर तुम्हाला खरच व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल कमी पडत असेल तर या योजनेच्या मदतीने तुम्ही तब्बल 10 ते 50 लाखापर्यंतचे कर्ज 0% व्याज दरावर मिळवू शकता.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Annasaheb Patil Loan Scheme Information In Marathi – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती मराठीमध्ये

आण्णासाहेब पाटील लोन स्कीम उद्देश असा आहे. तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे. दहा ते पन्नास लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज तुम्हाला या योजनेच्या मार्फत भेटू शकते आणि लाभार्थी महाराष्ट्रातील नागरीक असला पाहिजे आणि याची अर्ज प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीने आहे जे अधिकृत संकेतस्थळ आहे याची लिंक खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा हेल्पलाईन नंबर आहे 1800-120-8040 या हेल्पलाईन नंबर वरही कॉल करून तुम्ही सगळे डिटेल्स घेऊ शकता.

Annasaheb Patil Loan Scheme Benifit – अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे फायदे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेद्वारे गरजू तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 ते 50 लाखापर्यंत कर्ज भांडवल मिळते. तसेच जर तुमचा व्यवसाय अगोदरच असेल तर त्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी देखील या योजनेद्वारे कर्जपुरवठा केला जातो. कर्जावरील व्याजाची परतफेड लाभार्थ्याला करण्याची गरज नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ द्वारेच व्याजाची परतफेड सुद्धा केली जाते. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यामध्ये जर लाभार्थ्यांने दिलेल्या मुदतीत कर्जाचे नियमित हप्ते भरले तर त्यावरील 12% रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला जमा केली जाते.

Annasaheb Patil Loan Scheme Eligibility – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पात्रता

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा प्रथम महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी नागरीक असला पाहिजे.

त्यानंतर पुरुष अर्जदाराची वयाची अट 50 वर्षापर्यंत आहे. त्यापेक्षा जास्त वेळ असल्यास अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरत नाही.

तसेच महिला अर्जदारासाठी 55 वर्ष वयाची अट आहे

त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अशा कुटुंबातील पुरुषाला किंवा महिलेला दहा ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळते. आणि अर्जदार मराठा असणे आवश्यक आहे.

Annasaheb Patil Loan Documents List In Marathi – अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

अर्जदाराचे आधारकार्ड
अर्जदाराचे पॅन कार्ड
अर्जदाराचा फोटो
अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
अर्जदाराच्या वयाचा दाखला पुरावा
कास्ट सर्टिफिकेट (मराठा)
मोबाईल नंबर
इमेल आयडी

Annasaheb Patil Arthik Vikas Mandal Document – अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ बँकेतून कर्ज घेताना लागणारी कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड
कुटुंबाचे रेशन कार्ड
लाईटबिल
व्यवसाय सुरु करण्याचा परवाना
व्यवसाय प्रकल्प अहवाल
व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र
बँक खात्याचे स्टेटमेंट
बँक खाते सिबिल स्कोअर रिपोर्ट

Annasaheb Patil Karj Yojana 2024 Documents required for repayment of loan – अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरताना लागणारी कागदपत्रे
कागदपत्रे

बँकेचे कर्ज मंजुरी पत्र
बँकेचे खाते पासबुक
व्यवसाय सुरु करण्याचा परवाना
व्यवसाय प्रकल्प अहवाल
व्यवसायाचा फोटो

Annasaheb Patil Loan Bank List – अण्णासाहेब पाटील लोण बँक लिस्ट

सारस्वत को-ऑप. बँक मर्यादित
लोकविकास नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद
श्री. विरशेव को-ऑप बँक मर्या. कोल्हापूर
श्री. वारणा सहकारी बँक लिमिटेड वारणानगर
श्री. महालक्ष्मी को-ऑप बँक

Annasaheb Patil Loan Scheme Online Apply – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 ऑनलाईन अर्ज

सर्वप्रथम तुम्हाला आण्णासाहेब पाटील लोन स्कीम या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. लिंक खाली दिलेली आहे. त्या वेबसाईट वरती गेल्यावर नवीन नोंदणी बटणावर क्लिक करा. नोंदणी फॉर्म वरती तुमची सर्व माहिती भरून युजर नेम आणि पासवर्ड तयार करा.
अशा प्रकारे तुम्ही आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी नोंदणी करू शकता.

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 

हेही वाचा: 12वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी बंधन बँक भरती 2024

Conclusionनिष्कर्ष

आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Annasaheb Patil Loan Scheme 2024अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 बद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपणास या कर्जाची गरज असल्यास आपण ऑनलाईन अर्ज करू शकता, तसेच ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment