नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Vasai Virar Mahanagar Palika Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की वसई विरार महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर VVMC Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण NUHM Vasai Virar Municipal Corporation Bharti 2024 अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर NUHM VVMC मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या VVCMC Recruitment 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या वसई विरार महानगरपालिका भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Vasai Virar Mahanagar Palika Job Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Vasai Virar Mahanagar Palika Bharti 2024 Notification
पदाचे नाव –
क्षयरोग आरोग्य कार्यकारी – 03 जागा
औषध निर्माता – 01 जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 09 जागा
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 21 जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) 15वा वित्त आयोग – 53 जागा
या पदासाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
एकूण 83 +04 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.
वेतन –
या भरतीसाठी 15,000 ते 75,000 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
पदाचे नाव | वेतन |
क्षयरोग आरोग्य कार्यकारी | 15,000 रूपये ठोक वेतन + 1,500 प्रवास भत्ता |
औषध निर्माता | 17,000 रूपये ठोक वेतन |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) | शासकीय वेतन 60,000 + म.न.पा. कडून 15,000 रूपये प्रति महिना |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 30,000 रूपये प्रति महिना |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) 15वा वित्त आयोग | 60,000 रुपये प्रति महिना |
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
NUHM VVMC Bharti 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
क्षयरोग आरोग्य कार्यकारी व औषध निर्माता या पदासाठी पात्र उमेदवारांना 25 सप्टेंबर 2024 ते 04 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑफलाईन (प्रत्यक्ष/ पोस्ट) पद्धतीने अर्ज करता येतील.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS), अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) 15वा वित्त आयोग या पदांसाठी 26 सप्टेंबर 2024 ते 03 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
पदांची नावे | मुलाखतीचा/ अर्ज पाठविण्याचा पत्ता |
क्षयरोग आरोग्य कार्यकारी व औषध निर्माता | महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती, “सी” कार्यालय, 4था मजला, विरार (पू) |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) 15वा वित्त आयोग | वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय सामान्य परीषद कक्ष “ए” विंग 7वा मजला यशवंत नगर, विरार (प) येथे 11 ते 2 य वेळेत मुलाखती घेण्यात येतील. |
VVCMC Bharti 2024 Age Limit
वय मर्यादा –
पदाचे नाव | कमाल वयोमर्यादा |
क्षयरोग आरोग्य कार्यकारी | 65 वर्ष |
औषध निर्माता | 65 वर्ष |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 70 वर्ष |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 70 वर्ष |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) 15वा वित्त आयोग | 70 वर्ष |
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | पात्रता |
क्षयरोग आरोग्य कार्यकारी | उमेदवार हा विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा विज्ञान शाखेतील 12वी परीक्षा उत्तीर्ण आणि MPW / LHV / ANM / Health Worker म्हणून काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक किंवा आरोग्य शिक्षण / समुपदेशन यामधील उच्च प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरकारमान्य MSCIT अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. बहुद्देशीय आरोग्य कार्यकर्त्याचे शासन मान्य प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक. स्वच्छता निरीक्षक पदाचा शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. |
औषध निर्माता | कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून औषध निर्माता पदवी किंवा पदविका पास असणे आवश्यक. तसेच नामांकित रुग्णालयात किंवा शासनमान्य आरोग्य केंद्रात औषधसाठा व्यवस्थापन करण्यामध्ये 1 वर्षाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. उमेदवारास एम. एस. वर्ड, एक्सेल आणि सिम्पल स्टॅटीस्टीकल पॅकेजेस सह विविध संगणक प्रोग्रामिंगची चांगली माहिती असावी. |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) | एमबीबीएस सह MCI / MMC नोंदणी आवश्यक आहे. |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) | एमबीबीएस सह MCI / MMC नोंदणी आवश्यक आहे. |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) 15वा वित्त आयोग | एमबीबीएस सह MCI / MMC नोंदणी आवश्यक आहे. |
Vasai Virar Mahanagar Palika Recruitment 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना वसई विरार महानगरपालिका येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही मेरीट व मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Vasai Virar Mahanagar Palika Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन व पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03/04 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ 1 : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ 2 : येथे क्लिक करा
हेही वाचा: कृषि उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे नोकरीची संधी असा करा अर्ज
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Vasai Virar Mahanagar Palika Bharti 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की आरोग्य विभाग वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या वसई विरार महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024 साठी पात्र असाल आणि NUHM VVCMC मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Arogya Vibhag Bharti 2024 Last Date ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 03/04 ऑक्टोंबर 2024 आहे.
प्रश्न. Vasai Virar Mahanagar Palika Vacancy 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर एकूण 83+04 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.
प्रश्न. VVCMC Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – क्षयरोग आरोग्य कार्यकारी – उमेदवार हा विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा विज्ञान शाखेतील 12वी परीक्षा उत्तीर्ण आणि MPW / LHV / ANM / Health Worker म्हणून काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक किंवा आरोग्य शिक्षण / समुपदेशन यामधील उच्च प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सरकारमान्य MSCIT अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
बहुद्देशीय आरोग्य कार्यकर्त्याचे शासन मान्य प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक
स्वच्छता निरीक्षक पदचा शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
औषध निर्माता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून औषध निर्माता पदवी किंवा पदविका पास असणे आवश्यक.
तसेच नामांकित रुग्णालयात किंवा शासनमान्य आरोग्य
केंद्रात औषधसाठा व्यवस्थापन करण्यामध्ये 1 वर्षाचा अनुभव असणे अपेक्षित आहे.
उमेदवारास एम. एस. वर्ड, एक्सेल आणि सिम्पल स्टॅटीस्टीकल पॅकेजेस सह विविध संगणक प्रोग्रामिंगची चांगली माहिती असावी.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – एमबीबीएस सह MCI / MMC नोंदणी आवश्यक आहे.
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – एमबीबीएस सह MCI / MMC नोंदणी आवश्यक आहे.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 15वा वित्त आयोग एमबीबीएस सह MCI / MMC नोंदणी आवश्यक आहे.